माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीने छापा टाकला आहे. मुश्रीफ यांच्या कागलमधील राहत्या घरी हा छापा टाकण्यात आला आहे. पहाटेच्या सुमारास चार ते पाच अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल झाले असून अधिकाऱ्यांकडून
तपास सुरू आहे. दरम्यान, मुश्रीफ यांचे समर्थक त्यांच्या घराबाहेर दाखल झाले असून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.